ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या स्वरूपातील एकल एकीकृत निवृत्तीवेतन अर्ज

0
19

नवी दिल्ली: देशभरातील ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्तीवेतनधारकांचे राहणीमान सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, निवृत्तीधारकांना नऊ वेगळे अर्ज एकत्र करून भरण्याऐवजी एकच एकीकृत अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करत असल्याची घोषणा केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली.

एकल सुलभीकृ त निवृत्तीवेतन अर्ज आणि ई- एचआरएमएससमवेत भविष्यचा डिजिटल एकीकरणाचा आरंभ हा निवृत्तीवेतन विभागाने गाठलेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा आहे, हे केवळ सोयीसाठी नाही; तर आमच्या वडीलधाऱ्यांच्या वेळेचा आणि अनुभवाचा आदर करणे आणि ते सन्मानाने, त्रासमुक्त जीवन जगू शकतील याची खात्री करणे, या दृष्टीने निवृत्तीवेतन विभागाच्या मुकुटातील हा एक मानाचा तुरा असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
या अर्जासंदर्भात तपशील देताना डॉ. सिंह यांनी ई एचआरएमएसवर असलेले आणि सेवानिवृत्त होणारे अधिकारी हे ई-एचआरएमएसद्वारे (केवळ सेवानिवृत्ती प्रकरणे) फॉर्म ६-ए हा एकच अर्ज भरतील आणि ई-एचआरएमएसवर नसलेले सेवानिवृत्त होणारे अधिकारी फॉर्म ६ हा अर्ज भविष्यमध्ये भरतील निवृत्तीधारकाने ई-साइनसह (आधार आधारित ओटीपी) एकल अर्ज भरून देणे पुरेसे आहे, असे नमूद केले. नव्याने प्रकाशित केलेल्या एकीकृत अर्जाची रचना, निवृत्तीवेतनधारकांसाठी ही प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी केली गेली आहे. यामुळे अनेक अर्ज हाताळण्यातील जटिलता कमी होईल आणि लागणारा वेळ आणि मेहनत लक्षणीयरीत्या कमी होईल. या वापरावयास-अनुकूल पद्धतीमुळे लाखो ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. त्याच बरोबर त्यांना त्यांच्या निवृत्तीवेतनासंबंधित बाबी अधिक सहजतेने आणि सोयीस्करपणे व्यवस्थापित करता येतील, असे सिंह म्हणाले.
सरकार ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्याच्या आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी करण्याच्या आपल्या दृष्टिकोनाशी वचनबद्ध आहे. हा आधुनिक उपक्रम आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या प्रणाली सुलभ करण्याच्या आणि सुधारण्याच्या सतत सुरू असलेल्या प्रयत्नांचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here