गणेश व्यापारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री शिवानुभव मंडप येथे खेळीमेळीत पार पडली.संस्थेचे चेअरमन श्री बसवराज कल्याणी आणि व्हा.चेअरमन श्रीमती.महादेवी काळगी म्हणाले, संस्थेला ३० वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेला अर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा १ कोटी ३० लाख रुपये झाला असून, एकूण ठेवी रू.१३कोटी ३० लाख, एकूण कर्ज वाटप रु.१४ कोटी ४५ लाख रुपये, असून तरलते पोटी एकूण गुंतवणूक रु.५ कोटी ३८ लाख रुपये इतकी केली आहे.संस्थेकडे स्व निधी रु.५ कोटी ९६ लाख रुपये, तर वसूल भाग भांडवल रू.६४ लाख ४२ हजार रुपये इतकी आहे.एकूण व्यवसाय रू.२८ कोटी रुपये झाला आहे.
चालू आर्थिक वर्षात संस्थेला नेट निव्वळ नफा रु.६९ लाख रुपये. झाला असुन आणि एकुण एनपीए 0% असल्याचे चेअरमन श्री बसवराज कल्याणी यांनी सांगितले.तसेच संस्थेची स्वमालकीची एसी वातानू कुलित भव्य इमारत असून, सभासदांना कमीत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करत असून, संस्था सभासदांना दर वर्षी १०% डिवीडंड देत असून, या वर्षी सुद्धा १०% डिवीडंड मंजूर केला आहे.वार्षिक अहवाल वाचन चेअरमन श्री बसवराज कल्याणी यांनी केले. उपस्थित सभासदांचे स्वागत संस्थेचे व्यवस्थापक श्री सुनील जेऊर यांनी केले.
संस्थेचा गत ३० वर्षाचा वाढता आलेख पाहून सभासदांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेचे कर्मचारी श्री.सागर चंपान्नवर यांची श्री धांनमा देवी ट्रस्ट गुडापुरच्या संचालकपदी नियुक्ती झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जत शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी श्री कल्याणी मोगली, श्रीमंत ठोंबरे सर, जत अर्बन बँकेचे चेअरमन श्री.संभाजीराव बामणे, श्री. धान्नापा ऐनापुरे, संस्थेचे अध्यक्ष श्री बसवराज कल्याणी, व्हा.चेअरमन श्रीमती महादेवी काळगी,महिला संचालिका.श्रीमती सुलोचना हत्ती, वर्षा ताई संकपाळ, तसेच संचालक श्री.चंद्रशेखर संख,श्री अनिल पट्टणशेट्टी, श्री सागर बामणे, श्री शैलेश ऐनापुरे, माजी व्हा. चेअरमन श्री मोहन माळकोटगी आणि संस्थेचे सर्व कर्मचारी, बचत एजेंट, संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. शेवटी चहा पान कार्यक्रम संपल्यावर माजी व्हा. चेअरमन श्री मोहन माळकोटगी यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.