दोन मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन जन्मदात्यांनी कापले १५ किमी अंतर

0
16

आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. अशिक्षित आई-वडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासाच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला होता. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने ४ सप्टेंबरला आरोग्यसेवेची विदारक स्थिती उजेडात आली.

बाजीराव रमेश वेलादी (वय ६) व

दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी दुर्दैवी भावंडांची नावे. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे.

दोन दिवसांपूर्वी आई वडिलांसमवेत ते येथे आले होते. ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. काहीवेळातच दोघांचीही प्रकृती खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा व दुपारी १२ वाजता दिनेशचा मृत्यू झाला. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई-वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली.

 

मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगठ्ठ प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली; पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. नातेवाइकाची दुचाकी पोहोचले.

 

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here