मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतोय का ? |गेल्या तीन दशकांच्या संशोधनातील निष्कर्ष आला समोर 

0

मोबाइल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होत नाही, असे गेल्या तीन दशकांत झालेल्या संशोधनातून आढळले आहे. रेडिओलहरींचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल हा अभ्यास करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने याकामी पुढाकार घेतला होता. या संशोधनाबाबतचा लेख जर्नल एन्व्हॉयरमेन्टल इंटरनॅशनलच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

 

 

मोबाइल फोनमधील रेडिओलहरींमुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते, असा एक समज आहे. तोच केंद्रस्थानी ठेवून हे संशोधन करण्यात आले होते. त्यातून असे लक्षात आले की, मोबाइलमधील रेडिओलहरींचा मेंदूचा कर्करोग होण्याशी काहीही संबंध नाही. मात्र काही शास्त्रज्ञांनी मेंदूचा कर्करोग होण्याच्या कारणांमध्ये मोबाइल फोनच्या रेडिओलहरींचाही समावेश केला होता. २०११ साली इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने एका अभ्यासाअंती असाच निष्कर्ष काढला होता.

Rate Card

मेंदूच्या कर्करोगाच्या रुग्णांत मोठी वाढ नाही’

मोबाइलच्या रेडिओलहरी व मेंदूचा कर्करोग या विषयावर आजवर अनेक वेळा अभ्यास करण्यात आला.१९९४ ते २०२२ या कालावधीत ६३ अभ्यासांचे निष्कर्ष नियतकालिकांत प्रसिद्ध करण्यात आले होते.गेल्या तीन दशकांतील संशोधनातून असे लक्षात आले की, वायरलेस तंत्रज्ञानाचा प्रसार जगभरात मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी मेंदूचा कर्करोग झालेल्या रुग्णांच्या संख्येत खूप वाढ झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.