आधी वाचला; भरदिवसा पुन्हा कोयत्याने वार केला | तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना
गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असतानाच शहरात मागील तीन दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. हे तीनही खून वर्दळीच्या ठिकाणी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसी खाक्याला न जुमानता गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले आहे, विशेष म्हणजे पोलिसांवर देखील हल्ले झाले आहेत. त्यामुळे आपले शहर खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.