जत : महाराष्ट्र राज्यात लिंगायत समाजाची मोठे प्राबल्य आहे.आतापर्यत हा समाज राजकीय क्षेत्रात दुर्लक्षित राहिला असून राज्यातील लिंगायत समाजाचे नेते असलेले मंगेश चिवटे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी,अशी मागणी जत तालुका लिंगायत समाजाचे अध्यक्ष महादेव हिंगमिरे व वाळेखिंडीच्या सरपंच वसुधाताई हिंगमिरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे.
खा.शिंदे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हिंगमिरे यांनी विटा येथे त्याची भेट घेत तसे पत्र दिले.
महादेव हिंगमिरे म्हणाले,मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाचे प्रमुख म्हणून ते बऱ्याच कालावधीपासून काम करत आहेत.त्यांनी योजनेला लोकांची हक्काची योजना बनविण्यात मोठी कामगिरी केली आहे.या योजनेत फोन करून नोंदणी केलेला एकही नागरिक वैद्यकीय सेवेपासून वचिंत राहणार नाही,अशी खबरदारी चिवटे साहेबांनी घेतली आहे.प्रशासनातील बाप माणूस म्हणून त्याची ओळख असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे.अशा अनुभवी व्यत्कित्वाला आमदार करावे,असेही पत्रकात हिंगमिरे यांनी म्हटले आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार राहुल शेवाळे
आर.डी.पाटील,नवाळवाडी सरपंच अमोल शेटे,वाळेखिंडीच्या सरपंच सौ.वसुधा हिंगमिरे,शिवानंद लकडे,राहुल विसापुरे,मदन हिंगमिरे, महेश हिंगमिरे,जगदीश हिंगमिरे,संदीप पाटील,आदित्य शेटे,अविनाश शेटे व लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.