अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखांची मदत !

0
2

सोलापूर : आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका लोकमत न्यूज नेटवर्क यांचं काम मोठं आहे. शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांकडून केलं जातं. त्यांची अंमलबजावणी करतात. या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाच्या दुवा आहेत. अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना अनेकदा आपलं काम करत असताना प्रवास करावा लागतो. तसेच स्थानिक पातळीवर काम करावं लागतं. त्यामुळे एखाद्यावेळी अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनेची घोषणा केली आहे. या सेविकांना आता सरकारकडून १० लाखांचं विमा कवच दिलं जाणार आहे.

आशा सेविकांसाठी नेमका निर्णय काय? राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून आता आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू आल्यास १० लाख आणि अपंगत्वासाठी ५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय मोठा दिलासा आहे.

राज्य सरकारने काय म्हटलं आहे? राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे की, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here