किडनीचे औषध हृदयविकारावर उपयुक्त

0
18
नवी दिल्ली : मूत्रपिंड विकारावर वापरले जाणारे एक औषध हृदयविकाराचा झटका आलेल्या (मायोकार्डियल इन्फार्शन) रुग्णाला दिल्यास त्याचा हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका टळतो, असे एका आंतरराष्ट्रीय पथकाच्या संशोधनात आढळून आले आहे.

 

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडाची क्षमता विचारात न घेता त्याला एम्पाग्लिफ्लोजिन हे औषध दिले जावे. यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात, असे माऊंट सिनाई फ्युस्टर हॉस्पिटलमधील संशोधकांनी दाखवून दिले.

 

हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या रुग्णांचे कार्डियाक कॅथेटरायझेशन (रक्तवाहिनीत छोटी नळी घालून उपचार) करताना वापरण्यात येणारे कॉण्ट्रास्ट एजंट व लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध यांचा रुग्णाच्या मूत्रपिंडांवर विपरित परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर त्यांची हानीही होऊ शकते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच एम्पाग्लिफ्लोजिन हे औषध सुरू करण्यास डॉक्टर संकोच करतात. दुसरे कारण म्हणजे या औषधाच्या सुरक्षेविषयी फारसा डाटा उपलब्ध नाही. नवे संशोधन ही उणीव दूर करते. तीव्र हृदयविकार असलेल्या
६५२२ रुग्णांची दोन गटांत विभागणी करून त्यातील एका गटाला एम्पाग्लिफ्लोजिन हे औषध देण्यात आले आणि दुसऱ्याला नाही. ज्यांना हे औषध देण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची फारशी गरज भासली नाही, तसेच या गटात हृदयक्रिया बंद पडण्याचेही प्रकार कमी घडले. एवढेच नाही तर मूत्रपिंडांनाही इजा झाली नाही.

 

हे संशोधन हृदयविकाराच्या झटक्यातून बचावलेल्या रुग्णांसाठी एम्पाग्लिफ्लोजिन हे औषध वापरण्याबाबत असलेला माहितीचा अभाव दूर करण्यास मदत करते, असे या रुग्णालयाचे संचालक दीपक एल. भट्ट यांनी सांगितले. सोडियम ग्लुकोज को-ट्रान्सपोर्टर २ हे प्रथीन रक्तातील ग्लुकोज पुन्हा शोषून घेण्यासाठी मूत्रपिंडांना मदत करते. एम्पाग्लिफ्लोजिन औषध या प्रथिनाला अटकाव करू शकते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here