कॅलिफोर्निया : व्हॉटस्अँपचा वापर व्यक्तिगत कामांपासून कार्यालयीन कामांतही मोठ्या प्रमाणावर केला जात असतो; परंतु कार्यालयीन बैठकांसाठी झूम किंवा इतर लोकप्रिय अँप्सचा वापर केला जात असे; पण आता ही सोय व्हॉटसअँपनेही उपलब्ध करून दिली आहे.
युजर्सना लवकरच व्हाइस कॉल लिंक फीचर दिले जाईल. ही लिंक पाठवलेल्या मित्र किंवा नातेवाइकांना केवळ त्यावर क्लिक करून ऑडिओ कॉलमध्ये जॉइन होता येईल. चालू असलेल्या व्हिडीओ कॉलमध्ये इतरांना जाइन करणे शक्य होणार आहे. या लिंकमुळे मीटिंग करणेही आणखी सोपे होणार आहे.