अभियांत्रिकी प्रवेशात सध्या संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या यादीत संगणक अभियांत्रिकी, डाटा सायन्स, एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अभ्यासक्रमांचा बोलबाला असून, सर्वाधिक: 22 हजार 658 विद्यार्थ्यांना संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश जाहीर झाला असल्याचे स्पाट झाले आहे.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे एकूण 98 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यभरात 1 लाख 60 हजार 346 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 1 लाख 92 हजार 398 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेल्या 1 लाख 76 हजार 111 विद्यान्यपैिकी 1 लाख 26 हजार 458 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे.
काही अभ्यासक्रमांकडे पाठ राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीअंतर्गत विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत, त्यात फाईव्ह जी तंत्रज्ञानापासून टेक्सटाइलपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यातही संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांची संख्या जास्त आहे. कामै अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते. त्यानुसार फायर इंजिनिअरिंग, ऑईल फॅट्स अँड मॅक्सेस टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी आठ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला.
विषय शाखा अन् झालेले प्रवेश
संगणक अभियांत्रिकी 22 हजार 658 (सर्वाधिक) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन 14 हजार 747,मॅकेनिकल 14 हजार 269 माहिती तंत्रज्ञान 11 हजार 33,स्थापत्य: 9 हजार 814,विद्युत अभियांत्रिकी 5 हजार 70,कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डाटा सायन्स: 5 हजार 768,संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकीसाठी (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण)। 3 हजार 447,एआय आणि डाटा सायन्स 2 हजार 186,कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग 2 हजार 162,संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी 2 हजार 127,इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक 1 हजार 978,इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र 1 हजार 74