चार पिस्तुले, दहा काडतुसे जप्त आंदेकर खूनप्रकरण : परराज्यांतून आणली शस्त्रे; प्रत्यक्ष साक्षीदारांकडे चौकशी

0
10

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली असून, त्यापैकी चार पिस्तुले, दहा काडतुसे आणि सहा दुचाकी व एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे. वनराजचे वडील सूर्यकांत व भाऊ शिवम यांच्यासह दहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे चौकशी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण व घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल तपासणीसाठी पाठविला आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या मालकाचा पत्ता शोधण्यासाठी आरटीओची मदत घेतली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली. आंदेकरची बहीण संजीवनी कोमकर, मेव्हणे जयंत व गणेश कोमकर, प्रकाश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पोलिस कोठडीत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

 

वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सोळा आरोपींना अटक केली असून, तीन अल्पवयीन पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी मुलांना ताब्यात घेतले आहे. आणखी चार जणांचा शोध सुरू आहे. आरोपींपैकी आंदेकरची बहीण संजीवनी जयंत कोमकर (वय ४४), जावई जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२), गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७) व प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१, सर्व रा. नाना पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

 

तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद आणि सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी गुन्ह्याच्या तपासातील प्रगती अधोरेखित करताना आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९, ५४, १०९, १११ (१) (२) (३) (४) नुसार कलमवाढ करण्यात आली आहे. ■ हे आरोपी मुख्य सूत्रधार असून, संपत्ती व वर्चस्ववादातून त्यांनी अन्य आरोपींच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून निघृणपणे वनराजचा खून केला आहे.

 

त्यासाठी त्यांना पैसे, हत्यार, वाहन पुरवून गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आरोपींच्या मोबाइलची तांत्रिक तपासणी करायची आहे. त्यासाठी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकार पक्षाने केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here