जमदाडे फांऊडेशनचा उपक्रम,आदर्श शिक्षकांचे गौरव

0
13
शिक्षकांनी जीवन, शिक्षण पद्धती शिस्तबद्ध ठेवावी

– डॉ.अर्चना थोरात : प्रकाशराव जमदाडे युथ फौंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
जत : भविष्यात आदर्श समाज घडवायचा असेल तर प्रथम शिक्षकांनी आपली जीवन आणि शिक्षण पद्धती शिस्तबद्ध ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त इस्लामपूर येथील राष्ट्रीय व्याख्यात्या डॉ.अर्चना थोरात यांनी केले.
जत येथील प्रकाशराव जमदाडे युथ फौंडेशनच्यावतीने तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. अर्चना थोरात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विलासराव जगताप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर संघटनेचे राज्याचे नेते शिवाजीराव खांडेकर, शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे, माजी नगरसेवक मोहनभैया कुलकर्णी, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत सिंधुताई सावंत, शिक्षक नेते दिगंबर सावंत, राजेश कोळी, भारत क्षीरसागर, आर. आर. सावंत, अमोल माने, दिलीप पवार, संतोष काटे, गुरुबसू वाघोली, सिद्धेश्वर कोरे, चंद्रकांत गुडोडगी, अविनाश वाघमारे, शिवाप्पा तावशी, रामन्ना जिवण्णावर, नीलकंठ संती उपस्थित होते.
विलासराव जगताप यांनी डॉ. थोरात यांनी मांडलेल्या शिक्षकांच्या जबाबदाऱ्या योग्य आहेत. आदर्श शिक्षकांचे गुण शिक्षकांनी आत्मसात करावे. शिक्षकेत्तर संघटनेचे राज्याचे नेते शिवाजी खांडेकर म्हणाले, शिक्षकांना ज्ञानार्जनाबरोबर व अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. परिणामी शिक्षणाचा दर्जा खालावत आहे.त्यामुळे अशैक्षणिक कामे लावू नयेत यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.

 

 

प्रकाश जमदाडे म्हणाले, शिक्षक अविरत कष्ट करुन भावी पिढी निर्माण करण्याचे काम करीत असतात. भावी पिढी घडवतानाच शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातही शिक्षकांनी चांगले योगदान दिले आहे. अशा शिक्षकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. यापुढील काळातही शिक्षकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणार असल्याचे सांगितले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे, सचिव विजय रुपनूर, उपाध्यक्ष औदुंबर पोतदार, प्रमोद जमदाडे, योगेश व्हनमाने, प्रशांत चव्हाण आयींनी परिश्रम घेतले.
जतला हवा भूमिपुत्रच; शिक्षकांनी करावी जनजागृती
प्रकाशराव जमदाडे फौंडेशनने आयोजित केलेल्या शिक्षकांच्या या सत्कार सोहळ्याला तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. शिवाजीराव खांडेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या भाष्याचा धागा पकडत माजी आमदार विलासराव जगताप यांनी जतला हवा भूमिपुत्रच त्यासाठी शिक्षकांनी जनजागृती करावी. तीन लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्यात एकही आमदार होण्यास योग्य नाही का, आपल्या जन्मभूमीत दुसऱ्याने पाय ठेवणे चूक आहे. शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत भूमिपुत्रच हवा अशी जनजागृती करावी, असे आवाहन केले.
जत येथे प्रकाशराव जमदाडे फांऊडेशनचे‌ आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here