बुर्ज खलिफा नंतर,दुसरी सर्वात मोठी ‘ही’ इमारत ठरणार !
दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे जगातील दुसरी सर्वात उंच इमारत बांधली जात असून बुर्ज अझिझी असे या इमारतीचे नाव आहे. ही इमारत रिअल इस्टेट फर्म अझिझी डेव्हलपमेंटद्वारे बांधली जात असून तिची पायाभरणी याच वर्षी जानेवारीत झाली आहे. मात्र तिची नेमकी उंची त्यावेळी उघड झाली नव्हती. कारण दुबईमध्ये कोणतीही उंच इमारत बांधण्यासाठी जनरल सिव्हिल एव्हिएशन अँथॉरिटी (जीसीएए) कडून परवानगी घेणे आवश्यक असून या इमारतीचा विकासक दुबईच्या अधिकाऱ्यांच्या मंजुरीची वाट पाहत असल्याने असे करण्यात आले.
रिअल इस्टेट फर्म अझिझी डेव्हलपमेंट्सने बुधवारी जाहीर केले की, त्यांची गगनचुंबी इमारत एक वगळता शेजारच्या इतर सर्व इमारतींपेक्षा उंच असेल. अझिझी डेव्हलपमेंटने अहवाल दिला आहे की, बुर्ज अझिझी ७२५ मीटर म्हणजेच २ हजार ३७९ फूट उंच असेल. तर बुर्ज खलिफाची उंची ८२८ मीटर आहे. अझिझी डेव्हलपमेंट्सचे संस्थापक आणि अध्यक्ष मिरवाईस अझिझी यांनी लेखी निवेदनात सांगितले की, सुरुवातीपासून त्यांच्याकडे दोन डिझाइनच्या योजना होत्या. यातील एक ५२६ मीटर उंचीपर्यंत बांधण्यास मान्यता देण्यात आली होती, तर दुसरी ७२५ मीटर उंचीपर्यंत बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पायाभरणीचे काम सुरू करताना विकासकाने दोन्ही परिस्थितींसाठी आपले पर्याय खुले ठेवले होते.
परंतु इमारतीला हिरवा कंदील मिळण्याच्या अधिक महत्त्वाकांक्षी प्रस्तावासह पाया आणि पायलिंगचे अतिरिक्त काम सुरू आहे. या १३१ मजली गगनचुंबी इमारतीमध्ये अपार्टमेंट, एक सर्व-सूट सात-स्टार लक्झरी हॉटेल आणि सात मजली शॉपिंग मॉल असतील. दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर जिल्ह्यातील शेख झायेद रोडवर स्थित, बुर्ज अझिझी अजूनही २ हजार ७१७ फूट उंची बुर्ज खलिफापेक्षा सुमारे ३४० फूट लहान असेल. मात्र दोन इमारतींमधील अंतर दोन मैलांपेक्षा कमी आहे. सध्या दुबईतील दुसरी सर्वात उंच इमारत मरीना १०१ आहे, जी १३९४ फूट उंच आहे. मात्र अझिझी एकदा पूर्ण झाल्यावर, ती मलेशियाच्या २२२७ फूट उंच मर्डेका ११८ ला मागे टाकेल, ही सध्या जगातील दुसरी सर्वात उंच इमारत आहे.
अझिझी डेव्हलपमेंट्सच्या मते, टॉवरने जगातील सर्वात उंच हॉटेल लॉबी ११ व्या मजल्यावर नियोजित केली असून जगातील सर्वात उंच नाईट क्लब १२६ व्या मजल्यावर आणि जगातील सर्वात उंच निरीक्षण डेक १३० व्या मजल्यावर यासह अनेक विक्रम करणे अपेक्षित आहे. शिवाय ही इमारत दुबईच्या सर्वात उंच रेस्टॉरंटचे घर असेल म्हणजेच १२२ व्या मजल्यावरील ठिकाण बुर्ज खलिफाच्या १२२ व्या मजल्यावरील रेस्टॉरंटपेक्षा उंच असेल आणि टॉवरच्या ११८ व्या मजल्यावर शहरातील सर्वात उंच हॉटेल खोल्या असण्याचा विक्रमही या इमारतीच्या नावावर होणार आहे.