‘लाडकी बहीण’ चे पैसे दसऱ्यापूर्वी येणार खात्यावर 

0
Rate Card
सांगली : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यामध्ये चार लाख ५२ हजार ७२७ महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. नव्याने जिल्ह्यातून दोन लाख ४३ हजार १८६ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. या लाभार्थ्यांना शासनाकडून विजयादशमीपूर्वी दीड हजार रुपये मिळणार आहेत.

 

राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार लाख ५२ हजार ७२७ महिलांना झाला आहे. या योजनेसाठी आतापर्यंत सात

 

या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता काही महिलांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती दिली. महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदतही वाढवली होती. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाख ६२ हजार ९११ महिलांनी अर्ज केले होते. यापैकी दोन लाख ४३ हजार १८६ महिला पात्र असून त्यांच्या खात्यावर दसऱ्यापूर्वी दीड हजार जमा होणार आहेत


१०,४१६ अर्जात त्रुटी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने दोन लाख ६२ हजार ९१९ अर्ज आले होते. जिल्हा समितीने सर्व
अर्जाची पडताळणी करून १० हजार ४१६ अर्जात कागदपत्रातील त्रुटीमुळे प्रलंबित ठेवले आहेत. चार हजार ९९९ अर्ज अपात्र केले आहेत. दोन लाख
४३ हजार १८६ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.