स्वतःला ब्रह्मांडाचा स्वामी आणि मी देवाचा पुत्र आहे, असा दावा करणाऱ्या ७४ वर्षीय पादरी अपोलो क्विबोलॉय याला फिलीपिन्समध्ये बाल लैंगिक शोषण, मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शोधासाठी दोन आठवड्यांपासून २ हजार पोलिसांनी शस्त्रांसह दावाओतील ७४ एकरांवर पसरलेल्या किंगडम ऑफ जिझस क्राइस्ट चर्चच्या मुख्यालयाला वेढा घातला होता.
त्याला ताब्यात घेण्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर करावा लागला. क्विबोलॉयने १९८५ मध्ये केओजेसीची स्थापना केली. ती सुरुवातीला छोटी धार्मिक संस्था होती. परंतु, ती नंतर वेगाने वाढली आणि फिलीपिन्स आणि २००हून अधिक देशांमध्ये लाखो अनुयायी त्याच्याकडे आकर्षित झाले.
श्रद्धेच्या नावाखाली जबरदस्तीने गुलामी
आपल्या आध्यात्मिक साम्राज्यात क्चिबोलॉय याने गरीब महिला आणि मुलांचे शोषण केले. अशा लोकांना श्रद्धेच्या नावाखाली गुलामगिरीच्या जीवनात ढकलले गेले. २०२१मध्ये क्चिबोलॉयला अनेक आरोपाखाली अमेरिकेने दोषी ठरवले होते.
क्चिबोलॉयने १२ ते २५ वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण, तस्करी केली. त्याच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचे ‘पाप’ म्हणून त्यांना बाहेरील प्रार्थना पर्वतावर पाठवण्यात येत होते.
तेथे त्यांचे मुंडण करणे, मारहाण २ करणे असे प्रायश्चित होत असे. एफबीआयने सांगितले की, चर्चच्या सदस्यांना फसव्या व्हिसावर अमेरिकेत पाठविले जाई आणि त्यांना तिथे मुलांच्या धर्मादाय संस्थेसाठी देणग्या मागण्यासाठी भाग पाडले जाईल. या संपत्तीच्या जोरावर क्चिबोलॉयने प्रायव्हेट जेट, आलिशान मालमत्ता खरेदी केल्या