सांगली : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सप्टेंबर महिन्यामध्ये तालुका दौरा व सैनिक मेळावा दि. 18 सप्टेंबर रोजी शिराळा, 24 सप्टेंबर रोजी जत, व 27 सप्टेंबर रोजी विटा /खानापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सैनिक मेळावा संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी 11 ते 2 या वेळेत होईल. संबंधित तालुक्यातील सर्व माजी सैनिक व अवलंबितांनी सैनिक मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
मेळाव्यात कल्याण संघटक कार्यालयाच्या सर्व योजनांची माहिती देणार असून माजी सैनिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे अर्ज स्वीकारले जातील. कार्यालय व सैन्य अभिलेख कार्यालयाशी संबंधित अर्जही स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनीवर किंवा 9404969145 या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. चवदार यांनी केले आहे.