‘एनए’ नसताना प्लॉट पाडून बुकिंग; चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

0
9

सोलापूर : होटगी रोडवरील मजरेवाडी येथील जागेवर एनए ले आऊट मंजूर नसताना, बेकायदेशीर प्लॉटिंग करून दुसऱ्या लोकांकडून बुकिंग करून घेतल्याप्रकरणी चौघांविरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १६ जुलै २०२४ पासून आजतागायत घडला. बाबालाल शेख हसन जमादार (वय ६४, रा. आनंदनगर, होटगी रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मजरेवाडी येथे जुना सव्र्व्हे नं. २६५ / २ब / ब नवीन सर्व्हे नं. ८०/२ या जागेशी गुन्हा दाखल झालेल्या लोकांचा कोणत्याही मालकी हक्काचे कायदेशीर रजिस्टर नाही.

जागा दुसऱ्या लोकांना विकण्याचा अधिकार नव्हता. शिवाय एनए व ले आऊट मंजूर नसताना बेकायदेशीररीत्या ५४पैकी १९ प्लॉटची विविध लोकांकडून बुकिंग घेतली. बुकिंगपोटी रक्कम घेऊन जागा दुसऱ्या लोकांना बॉन्ड पेपर, इसारा पावती, व्हॉऊचर पावती १ लाख ५० हजाराची केली. प्लॉट विक्री केल्यानंतर दोघांनी सैफन पिरजादे व अशपाक पिरजादे यांच्या सांगण्यावरून बेकायदा पाडलेल्या प्लॉट नं. १२ वर पत्रा शेड मारून अतिक्रमण केले, अशी नोंद झाली आहे. याप्रकरणी सैफन फरदीन पिरजादे (रा. सहारानगर भाग-१), अशपाक सैफन पिरजादे, प्रकाश धोंडीराम उडानशिव (रा. भैरूनगर, लिमयेवाडी), दीपक धोंडीराम उडानशिव (रा. सोलापूर) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (३), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here