अबब..१६ हजार वीज ग्राहकांचे धनादेश ‘बाऊन्स’

0
73

महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’द्वारे विविध पर्याय उपलब्ध असतानाही गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब ग्राहकांनी वीजबिलांपोटी दिलेले ४१ कोटी ८९ लाख रुपयांचे १६ हजार १४१ धनादेश विविध कारणांमुळे अनादरीत (चेक बाऊन्स) झाले आहेत. त्यामुळे या ग्राहकांना बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून तब्बल १ कोटी २१ लाख ५ हजार ७५० रुपयांचा नाहक दंड तसेच १.२५ टक्के विलंब आकार शुल्क देखील भरावे लागले आहे. त्यामुळे धनादेशाऐवजी घरबसल्या ‘ऑनलाईन’ वीज बिल भरणा फायद्याचे झाले आहे.

धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. याउलट पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला राज्यात सर्वाधिक ४२ लाख १२ हजार (७९ टक्के) लघुदाब वीजग्राहक सरासरी ११९५ कोटी ७० लाख रुपयांच्या (८० टक्के) वीज बिलांचा घरबसल्या भरणा करीत आहेत.अनादरीत धनादेशासाठी चुकीची तारीख खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, संबंधीत खात्यात रक्कम नसणे आदी कारणे दिसून येत आहेत.अनादरीत धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा एकत्रित भरणा केला असल्यास दंडात्मक रक्कम व विलंब आकार लावण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक चेक बाऊन्स

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत गेल्या सहा महिन्यांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ५४३ धनादेश अनादरीत झाल्याने बँक अँडमिनिस्ट्रेशन चार्जेसचे ९४ लाख ७ हजार २५० रुपये भरावे लागले आहे. तर सातारा ४८८ धनादेश अनादरीत झाल्याने ३ लाख ६६ हजार रुपये सोलापूर- ८९४ धनादेश अनादरित झाल्याने ६ लाख ७० हजार ५०० रुपये, कोल्हापूर- १७२२ धनादेश अनादरीत झाल्याने १२ लाख ९१ हजार ५०० आणि सांगली जिल्ह्यात ४९४ धनादेश अनादरित झाल्याने ३ लाख ७० हजार ५०० रुपये ग्राहकांना भरावे लागले आहे.

वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईनसह

इसीएलएनईएफटी आरटीजीएस’ असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात दरमहा सरासरी २६९० धनादेश अनादरित झाले आहेत. त्यामुळे लघुदाब ग्राहकांनी धनादेशाऐवजी ऑनलाईनद्वारे वीजबिलांचा भरणा करावा. भुजंग खंदारे, प्रादेशिक संचालक, पुणे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here