बनावट कागदपत्रांनं आजोबाचेच नाव वगळले

0

सोलापूर : खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून सिटी सर्व्हेवरील आजोबाचे नाव वगळून, दोघांची बेकायदा नोंद घेतल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राकेश विजय कटारे (रा. रेल्वे लाईन, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ मे २०२४ पासून आजतागायत शहरातील रविवार पेठ येथील सिटी सर्व्हे ०९/८८ क्षेत्र २२५० या जागेसंदर्भात सिटी सर्व्हे अधिकारी व विशेष कार्यकारी दंडाधिकारी, सोलापूर यांची खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. स्वतःला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी ते कागदपत्रे खरे असल्याचे भासवले.

Rate Card

कागदपत्रांच्या आधारे सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत ‘डी’ व सब ‘डी’ सोलापूर तालुका शहर सोलापूरपैकी रविवार पेठेतील सिटी सर्व्हेच्या उताऱ्यावरील फिर्यादीचे आजोबा तिपण्णा किशोर कटारे यांचे नाव कमी केले. त्यावर काका किशोर तिपण्णा कटारे व मयत सुभाष तिपण्णा कटारे यांचे नाव बेकायदेशीररीत्या नोंद घेतली. बेकायदा नोंद केल्याप्रकरणी किशोर तिपण्णा कटारे (रा. रेल्वे लाईन), अनिल गोविंद भूषण (रा. रविवार पेठ), कासिम गुडूभाई शेख (रा. विजयलक्ष्मीनगर), दशरथ भगवान गायकवाड (रा. कटारे कॉम्प्लेक्स), विलास रमाकांत शेंडगे (रा. भवानी पेठ) यांच्याविरुद्ध भादवि कलम ४२०, ४७१, १९९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.