जत : माझी वसुंधरा अभियान ५ अंतर्गत जत नगरपरिषदेने शहरात १० हजाराहून अधिक झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शहरात आयुर्वेदिक गार्डन उभारण्यात येणार असल्याची माहिती जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी दिली. या अभिनव उपक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात शहरातील विजयपूर रोड येथील वसुधा ग्रीन सिटी येथे जतचे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक कुंभार यांच्याहस्ते दोन हजार झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी किरण जाधव, प्रदीप कुलकर्णी, जत नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक अजिंक्य पाटील, पाणीपुरवठा अभियंता मानसी कदम, कर निरीक्षक राणी पाटील, स्वच्छता निरीक्षक गणेश पावसकर, शहर समन्वयक हिमाली रड्डेकर, लिपीक नितीन कांबळे, विजय माळी, रामभाऊ पवार, वसुधा ग्रीन सिटीचे डेव्हलपर्स सोमालिंग कोळी उपस्थित होते. प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.