दिवसाढवळ्या बालिकेवर अत्याचार आरोपी ओळखीचाच, शोधाशोध सुरू
ओळखीच्या घरात शिरून एका नराधमाने दिवसाढवळ्या एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पारडी परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. ती उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.