पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्रिपद मिळायला हवे. काँग्रेसमध्ये माझ्यासह चार-पाच जणींच्या नावाचा विचार होऊ शकतो. मित्र पक्षांतील सुप्रिया सुळे, रश्मी उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री केले तरी चालेल, असे विधान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी केल्याने पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का, ही चर्चा सुरू झाली आहे.
या स्पर्धेत काही महिला नेत्या असल्याचे त्या-त्या वेळी चर्चेत आले. पण, प्रत्यक्ष संधी कोणालाही मिळाली नाही. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे विधान भाजपच्या पंकजा मुंडे यांनी पूर्वी केले होते. आता वर्षा गायकवाड यांनी स्वतःसह सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे या पदासाठी घेत ‘महिला कार्ड’ पुढे केले आहे.