सोबत विवाह न केल्याने विवाहतेची निघृण हत्या

0
20
Crime scene barricade covering. Murder case of a criminal young male.

प्रेमसंबंध असतानाही दुसऱ्याशी विवाह केल्यानंतर तीन वर्षांनी प्रेयसीचा शोध घेऊन तिच्यावर चाकूने वार करुन तिचा निघृण खून केल्याचा प्रकार विश्रांतवाडीतील कळस येथे बुधवारी घडला. गौरी लणेश आरे (वय २५, रा. कळस माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अमोल दिलीप कांबळे (वय २५, रा. श्रमिकनगर, धानोरी) याला अटक केली आहे.

याबाबत लणेश धनाजी आरे (वय २४, रा. लक्ष्मीकुंज सोसायटी, कळस माळवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी आरे हिचे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सासर आहे. तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. ती कळस येथे रहायला आली. आरोपी अमोल कांबळे हा तिचा वर्गमित्र होता. गौरी हिने त्याच्यासोबत लग्न न केल्याने त्याचा त्याला राग होता.

लग्न झाल्यानंतर गौरी हिचा शोध घेण्याचा अमोल याने खूप प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी त्याला गौरी कळस येथे रहात असल्याचे समजले. कळस माळवाडी येथील ट्रिनिटी स्कुलसमोरील रोडवरुन गौरी तिच्या मैत्रिणींसह रात्री सव्वा आठ वाजता पायी घरी येत होती. अमोल याने गौरी हिच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तिला रुग्णालयात दाखल केले असता सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाला.

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here