पगारवाढीच्या आमिषाने मुलीवर केला अत्याचार

0

 

नॉव्हेल्टी दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून दुकान मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी यासीर नासीर पटवेगार (वय ३१) आणि त्याची पत्नी रुकैय्या यासीर पटवेगार (३१ दोघे, रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. यातील यासीर याला पोलिसांनी अटक केली.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मे २०२४ पासून यासीर पटवेगार याच्या लक्ष्मीपुरी येथील लुगडी ओळ परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करीत होती. यासीर हा तिला पगार वाढविण्याचे आमिष दाखवून कपिलतीर्थ मार्केट येथील लॉजमध्ये घेऊन गेला.लैंगिक अत्याचार केल्याने पीडित मुलीने दुकानातील काम बंद केले. मात्र, त्यानंतरही यासीर आणि त्याच्या पत्नीने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला दमदाटी आणि मारहाण केली.हा प्रकार जून ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. अखेर पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी संशयित यासीर पटवेगार याला अटक केली.

Rate Card

प्रेमसंबंध असतानाही दुसऱ्याशी विवाह केल्यानंतर तीन वर्षांनी प्रेयसीचा शोध घेऊन तिच्यावर चाकूने वार करुन तिचा निघृण खून केल्याचा प्रकार विश्रांतवाडीतील कळस येथे बुधवारी घडला. गौरी लणेश आरे (वय २५, रा. कळस माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी अमोल दिलीप कांबळे (वय २५, रा. श्रमिकनगर, धानोरी) याला अटक केली आहे.

याबाबत लणेश धनाजी आरे (वय २४, रा. लक्ष्मीकुंज सोसायटी, कळस माळवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी आरे हिचे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सासर आहे. तीन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला. ती कळस येथे रहायला आली. आरोपी अमोल कांबळे हा तिचा वर्गमित्र होता. गौरी हिने त्याच्यासोबत लग्न न केल्याने त्याचा त्याला राग होता. लग्न झाल्यानंतर गौरी हिचा शोध घेण्याचा अमोल याने खूप प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी त्याला गौरी कळस येथे रहात असल्याचे समजले. कळस माळवाडी येथील ट्रिनिटी स्कुलसमोरील रोडवरुन गौरी तिच्या मैत्रिणींसह रात्री सव्वा आठ वाजता पायी घरी येत होती. अमोल याने गौरी हिच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तिला रुग्णालयात दाखल केले असता सकाळी ७ वाजता तिचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.