यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी?

0
2

विधानसभेच्या निवडणुकीत २०१९ च्या विधानसभेला राज्यातून २४ महिला विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. याचा अर्थ २८८ पैकी केवळ सात टक्के महिला आमदार होत्या. त्यातील निम्म्या म्हणजे १२ महिला आमदार भाजपच्या तर पाच काँग्रेसच्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, शिवसेनेच्या दोन तर दोन अपक्ष महिला उमेदवारांनी त्यावेळी निवडणूक जिंकत विधानसभा गाठली होती.

 

लोकसभा, विधानसभेच्या २०२९ मधील निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्क्के आरक्षण असणार आहे असे मानले जात आहे. त्यावेळी राज्यातून तब्बल ९५ महिलांना आमदारकी मिळेल. मात्र, पूर्वेतिहास बघता यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही महिलांवर मुख्य राजकीय पक्षांकडून अन्याय होण्याची शक्यता आहे.

 

२०१९ मध्ये या महिला झाल्या होत्या विजयी

 

भाजप – १) सीमा हिरे (नाशिक पश्चिम), २) विद्या ठाकूर (गोरेगाव), ३)भारती लव्हेकर (वर्सोवा), ४) मुक्ता टिळक (कसबा पेठ), ५) मंदा म्हात्रे (बेलापूर), ६) माधुरी मिसाळ (पर्वती, पुणे), ७) देवयानी फरांदे (नाशिकमध्य), ८) मोनिका राजळे (शेवगाव), ९) श्वेता महाले (चिखली), १०) नमिता मुंदडा (केज), ११) मेघना बोर्डीकर (जिंतूर), १२) मनीषा चौधरी (दहीसर).काँग्रेस – १) यशोमती ठाकूर (तिवसा), २) वर्षा गायकवाड (धारावी), ३) प्रणिती शिंदे (सोलापूर मध्य), ४) सुलभा खोडके (अमरावती), ५) प्रतिभा धानोरकर (वरोरा). राष्ट्रवादी – सुमनताई पाटील (तासगाव), २) अदिती तटकरे (श्रीवर्धन), ३) सरोज अहिरे (देवळाली).■ शिवसेना – १) लता सोनवणे (चोपडा), २) यामिनी जाधव (भायखळा).अपक्ष – १) गीता जैन (मीरा भाईंदर), २) मंजुळा गावित (साक्री).

 

या आमदार महिला लोकसभा जिंकल्या

आमदार महिलांपैकी वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर चालू वर्षी लोकसभा निवडणुकीत जिंकल्या. यामिनी जाधव यांनी शिंदेसेनेतर्फे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविली; पण त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये २४ महिला आमदार झाल्या. तरीही हा आकडा आजवरचा सर्वाधिक आहे.

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here