तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलले | तिघेही वाचले; कारणाचा शोध सुरू

0
7
सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील विहिरीत तीन शाळकरी मुलांना ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यातील एका मुलाने स्वतः सह अन्य दोघांचाही जीव वाचवला. पोलिसांनी एकास अटक केली, दोघा संशयित आरोपींचा शोध सुरू असून, घटनेच्या कारणांचाही तपास केला जात आहे.
वडगाव पिंगळा (ता. सिन्नर) येथील नाशिक कारखाना रस्त्यालगत बुधवारी सायंकाळी वरद संतोष घुगे (वय १३), अथर्व संतोष घुगे (वय ९) आणि आदित्य योगेश सानप (वय १३) ही तीनही मुले खेळत होती. यावेळी अमोल लांडगे याने विहिरीजवळ उभ्या असलेल्या दोघांकडून कासव घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार वरद व अथर्व व आदित्य हे उत्सुकतेने विहिरीकडे गेले.
विहिरीजवळ विक्रम नारायण माळी आणि साईनाथ शिवाजी ठमके (रा. वडगाव पिंगळा) हे उभे होते. त्यांनी मुलांना विहिरीत कासव असल्याचे सांगितले. मुले विहिरीत पाहात असताना माळी व ठमके या दोघांनी तीनही मुलांना विहिरीत ढकलून देत तेथून पळ काढला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here