जत : जत तालुक्यातील खलाटी (ता. जत) येथील समाधान ऊर्फ सचिन प्रभू चव्हाण (वय २५) याने राहत्या घरी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. समाधान हा अविवाहित असून, तो मजुरी करीत होता. खलाटीतील चव्हाण वस्ती ते मिरवाड रोडवर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या राहत्या घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
त्यास दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेतच त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी पाच वाजता कामावरून घरी आल्यानंतर तिच्या आईने प्रथम पाहिले. घटनेनंतर खलाटीचे पोलिस पाटील भाऊसाहेब शेजूळ यांनी जत पोलिस ठाण्यास कळवून घटनेची पोलिसांना माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित दोन बहिणी,असा परिवार आहे.