चक्क पोषण आहारातील ४०० किलो तांदुळ लंपास

0
11
Crime danger disgrace scandal shame breaking news newspaper urgent headline background.
कोसारी (ता. जत) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांकरिता असलेल्या प्रधानशक्ती माध्यान्ह पोषण आहाराचा ४०० किलो तांदूळ अज्ञात चोरट्याने चोरला आहे. सदरचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला आहे. याबाबतची फिर्याद प्रशालेचे मुख्याध्यापक भीमसेन नामदेव नागणे यांनी जत पोलिसात दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३०५ (अ) नुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेली माहिती अशी अशी, न्यू इंग्लिश स्कूल कोसारी या प्रशालेत ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रधानशक्ती माध्यान्ह पोषण आहार या योजनेअंतर्गत तांदूळ शिजवून दिला जातो. याकरिता शासनाने दिलेला तांदूळ प्रशालेतील व्हरांड्यातील कोठीमध्ये साठा केलेला होता. शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शाळा उघडत असताना तांदळाच्या कोठीचे कुलूप तुटलेले दिसले. शालेय परिसरात तांदळाचा इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तांदूळ सापडला नाही. मुख्याध्यापक नागणे यांनी चोरीचा फिर्याद दाखल केली आहे.
शाळेत चोरीचा दुसरा प्रकार
यापूर्वी कोसारी जिल्हा परिषद शाळेत ११ जून रोजी संगणक प्रिंटर, सौरऊर्जेच्या बॅटऱ्या, माईक, स्पीकर, तांदळ असा एकूण ३५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत १२ जून रोजी जत पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अशातच पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलमधील तांदळाची चोरी झाली आहे. चोरट्यावर पोलिसाचा वचक राहिला नाही. चोरट्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर तपास पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांतून होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here