बिळूर येथे सवलतीत सायकली,अट्टाचक्कीचे वितरण | प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनचा तालुक्यात उपक्रम

0
3
जत : सामाजिक दायित्व व बांधिलकी या हेतूने प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यात समाज उपयोगी व समाजहिताचे स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या दशकभरात जळीतग्रस्तांना मदतीचा हात, विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप, शिलाई मशीनचे वाटप यासह विविध दिनाचे औचित्य साधून उपेक्षित , वंचित घटकांचा सन्मान, विविध क्षेत्रात योगदान असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान, प्रेरणादायी उपक्रम, शेतकरी मार्गदर्शन शिबिर,शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालाला शाश्वत हमीभाव मिळावा यासाठी पाठपुरावा, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड ,गरजूंना मदतीचा हात यासह अनेकविध स्तुत्य उपक्रम राबवीत आहेत.याचा लाभ विविध घटकांना होत आहे.असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.
     
बिळूर (ता.जत) येथे प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना नामांकित व दर्जेदार कंपनीचे उत्पादन वस्तू ते थेट ग्राहकाना या उद्देशाप्रत सवलतीच्या दरात सायकल व घरगुती अट्टाचक्कीचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलत होते. दुकानातील वस्तूपेक्षा ३० टक्के सवलतीच्या दरात जमदाडे फाउंडेशनने दैनंदिन उपयोगातील वस्तू उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
       
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोड्डगी,माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी ,बसर्गीचे सरपंच शिवाप्पा तावशी, उमराणीचे सरपंच विजयकुमार नामद, वज्रवाड सोसायटीचे चेअरमन चिदानंद चौगुले , बसवराज धोडमाळ,सुरेश मूडशी आदी मान्यवर उपस्थित होते.
     
या कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे म्हणाले, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना फाउंडेशनच्या माध्यमातून विविध घटकांचा सन्मान करण्याबरोबर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजेत.या उद्देशातून तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ते, पिण्याच्या पाण्याची ,शेतीच्या पाण्याची, मूळ म्हैशाळ योजना पूर्णत्वास यावी, विस्तारित म्हैशाळ योजनेसाठी पाठपुरावा त्याचबरोबर संघर्ष केला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनमानात बदल घडून आणण्यासाठी विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. त्याचबरोबर  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, तालुक्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय उभे करावे, तरुणांच्या हाताला काम मिळावे.पंचतारांकित एमआयडीसी व्हावी याकरीता प्रयत्नशील आहोत .प्राधान्याने प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई केलेली आहे. तालुक्यातील न्याय व हक्कासाठी कायम कार्यरत राहू अशी ग्वाही जमदाडे यांनी दिली.
जत : प्रकाशराव युथ फाऊंडेशनच्या वतीने सवलतीच्या दरात सायकल व अट्टाचक्कीचे वाटप करताना माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे व मान्यवर
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here