
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जत तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठीची न शासनाची ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही योजना हवेतच विरली आहे. – पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. दररोज ७ ते ८ ट्रक लाकूड भरून जात आहेत. लाकूड वखारीचा धंदाही तेजीत सुरू आहे. अवाजवी वृक्षतोड 1. होऊ लागल्याने भाग भकास बनला आहे.
जत तालुक्यात वनक्षेत्र ११३०५ हेक्टर आहे. बाभूळ, चिंच, लिंब, आंबा, – निलगिरी झाडांची तोड सुरू आहे. दररोज लाकूड इंचलकरंजी, सांगली, मिरज, कोल्हापूर भागात जाते. ताडपदरी झाकून वाहतूक केली जाते. नाका चुकवून रोज दिवसा व रात्री ट्रक भरून लाकूड वाहतूक सुरू आहे. नाके बंद असून फक्त कागदोपत्रीच सुरू आहेत.जत तालुक्यात केवळ ६ टक्के वनक्षेत्र आहे. वृक्षतोडीमुळे उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. शत कोटी वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. शासनाची झाडे लागवडीची नोंद कागदावरच आहे.
डफळापूर,संख, दरीबडची परिसरात वृक्षतोड
बेंळूखी,संख, दरीबडची परिसरात वृक्षतोड सुरू आहे. जुनी झाडे तोडल्याने परिसर ओसाड बनला आहे. वनविभागाने लक्ष देऊन अवाजवी वृक्षतोड टाळावी. अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.दरम्यान जत पश्चिम भागातील सर्वच गावात दिवसाढवळ्या वृक्ष तोड केली जात आहे.शाळा शासकीय जमिनीतीलही झाडे विना परवानगी तोडली जात आहेत.
वृक्षतोडीची माहिती घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. माझ्याकडे तात्पुरता पदभार आहे.
– विलास पावले
हंगामी वनपरिक्षेत्र अधिकारी, जत.