चुलत्या – पुतण्याच्या दिवाणजीला ‘डीडीआर’चा दणका | – महादेव पाटील : तासगाव बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील यांचे संचालकपद रद्द

0
5

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील व चिरंजीव रोहित पाटील यांच्या आर्थिक भानगडी सांभाळणारे रवींद्र वसंत पाटील यांना जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे दणका दिला आहे. त्यांचे बाजार समितीचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे. चुलत्या – पुतण्याच्या दिवाणजीला हा दणका आहे, अशी माहिती बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या तासगाव बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. बाजार समितीच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर येत आहेत. विस्तारित बाजार समितीच्या बांधकामात झालेल्या अपहारप्रकारणी फौजदारी गुन्हा दाखल होत आहे. बाजार समितीला भ्रष्टाचाराचा सुरुंग लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची असणारी बाजार समिती आता चुलत्या – पुतण्याची झाली आहे.

याच चुलत्या – पुतण्याच्या आर्थिक भानगडी सांभाळणाऱ्या दोन दिवाणजींपैकी रवींद्र वसंत पाटील या दिवाणजीला जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दणका दिला आहे. त्यांचे संचालकपद रद्द करण्याचा आदेश सुरवसे यांनी दिला आहे.

रवींद्र पाटील हे अराबा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्याकडे व्यापारी लायसन आहे. असे असताना त्यांनी शेतकरी गटातून निवडणूक लढवली होती. यावेळी बाजार समितीने ते एका कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्याकडे व्यापारी परवाना आहे, हे लपवून ठेवले होते. याबाबत बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर रवींद्र पाटील यांचे संचालकपद रद्द करण्याचा आदेश सुरवसे यांनी दिला.

याबाबत महादेव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही बाजार समितीतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवत आहोत. पाठपुरावा करीत आहोत. बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत आहे. रवींद्र पाटील हे व्यापारी गटात असताना त्यांच्याबाबतची माहिती बाजार समितीने लपवली. त्यामुळेच त्यांनी शेतकरी गटातून उमेदवारी अर्ज भरला. तेथून ते निवडून आले. बाजार समितीतील हाही एक भ्रष्टाचारच आहे.

ते म्हणाले, बाजार समितीतील भ्रष्टाचाराचे हे हिमनगाचे टोक आहे. अजून अनेक भानगडी चव्हाट्यावर येणार आहेत. स्व. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील व चिरंजीव रोहित पाटील यांच्या आर्थिक भानगडी सांभाळण्यासाठी दोन दिवाणजी आहेत. त्यापैकी रवींद्र पाटील हे एक आहेत. चुलत्या – पुतण्याच्या या दिवाणजीला आज जिल्हा उपनिबंधकांनी दणका दिला आहे.

40 संचालकांच्या हातात बेड्या पडणार : महादेव पाटील*
महादेव पाटील म्हणाले, बाजार समितीत आजपर्यंत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारास अनेक संचालक जबाबदार आहेत. त्यामुळे या चुलत्या – पुतण्याच्या नादात बऱ्याच संचालकांच्या हातात आगामी काळात बेड्या पडणार आहेत. सुमारे 40 ते 42 संचालकांवर कारवाई होण्याचे संकेत त्यांनी दिले.

*दुसरा दिवाणजी कोण…?*

स्व. आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील व चिरंजीव रोहित पाटील यांच्या आर्थिक भानगडी सांभाळण्यासाठी दोन दिवाणजींची नेमणूक करण्यात आली आहे, असा आरोप महादेव पाटील यांनी केला. त्यापैकी रविंद्र वसंत पाटील यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. मात्र सुरेश पाटील व रोहित पाटील यांच्या आर्थिक भानगडी पाहणारा दुसरा दिवाणजी कोण, याबाबत पत्रकार परिषदेत चर्चा रंगली होती.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here