जत : मौजे बिळूर (ता. जत) येथे म्हैशाळ योजनेचे पाणी प्रथमच दाखल झाले असून केसराळ तलावात जलपूजनाचा सोहळा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाने पार पडला. या योजनेमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होणार असून पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल. यावेळी ग्रामस्थांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र सततच्या प्रयत्नांमुळे तुबची बबलेश्वर आणि म्हैशाळ योजनेचे पाणी तालुक्यात आले आहे. हे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून जत तालुका संपूर्ण हरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या ध्येयासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन यावेळी आ.सावंत यांनी ग्रामस्थांना केले.