जत : जत तालुक्यातील महिलांसाठी विधान भवन दर्शन आयोजित करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून जत तालुक्यातील महिलांना आपल्याला लोकशाहीचे मंदिर दाखवायचे होते. अखेर सर्व महिला भगिनींना राज्याचा कारभार कसा चालतो आणि तो कुठून चालतो हे सगळे त्यांना दाखविले. या अनोख्या अनुभवात महिलांना विधानसभा कामकाजाची जवळून पाहणी करण्याची सुवर्णसंधी मिळाली.
विशेष म्हणजे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार यांची भेट झाली. ज्यामुळे महिलांना शासनाच्या निर्णय प्रक्रियेतील भूमिका समजून घेण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमामुळे महिलांना समाजकारणात आणि शासनव्यवस्थेत अधिक सक्रीय होण्याची प्रेरणा मिळाली आहे.या दौऱ्याचे नियोजन जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले होते.