आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे, यास ‘अंधश्रद्धा’ असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र- मंत्र, जादूटोणा, नरबळी, नजर टोक तसेच भूत-प्रेत, पिशाच, नजर लागणे, मांजर आडवं जाणे, शिंक येणे, कावळा ओरडणे, टिटवी ओरडणे, कुत्री रडणे, लिंबू-मिरची टाकणे, अंगात येणे, ज्योतिष विशारद, वास्तुशास्त्र, केरसुणी आडवी उभी ठेवणे, भूत लागण, रात्री कचरा बाहेर टाकणे, रात्री नखे काढणे, अशा विविध अंधश्रद्धा फिरविणाऱ्या गोष्टींवर आपण भूलतो आणि आपलं मत नसतानासुद्धा यावर आपण विश्वास ठेवतो.
जादूटोणाविरोधी कायदा?
समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३’ असे आहे.
शिक्षेची तरतूद काय..
हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. या कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला किमान सहा महिने ते जास्तीत जास्त सात वर्षे कारवास होऊ शकतो. यासोबतच किमान पाच हजार ते जास्तीत जास्त ५० हजारांपर्यंत दंड किवा कारावास आणि आर्थिक दंड दोन्ही एकत्रित शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. ‘अंनिस’ या कायद्याबाबत पोलिसांना प्रशिक्षणही देण्यासही तयार आहे. मात्र, याची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तरच जिल्ह्यात गुन्हे दाखल होतील.असे’अंनिस’चे पदाधिकारी यांनी सांगितले.