हप्ता प्रतिवर्षी भरावा लागतो: चार लाखांवर लोकांनी भरला
बँकेत वार्षिक ४३६ रुपयांचा हप्ता भरल्यानंतर दोन लाखांचे जीवन विम्याचे कवच असते. जिल्ह्यात हा विमा ४ लाख ७१ हजार ८१ जणांनी उतरवला आहे. अपघातात शारीरिक हानी झाली तर भरपाई मिळते. सरकार पुरस्कृत ही योजना आहे. बँकांतर्फे योजना राबविली जात असल्याने हप्त्यामध्ये पारदर्शकता आहे. मात्र, बँकनिहाय किती जणांना या योजनेचा लाभ मिळाला, याची आकडेवारी प्रशासकीय पातळीवर उपलब्ध नाही. ती आकडेवारी मिळावी, अशी मागणी होत आहे.
काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना?
• प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास जीवन विमा संरक्षण देते. एक वर्षासाठी कव्हर आहे. वर्षानुवर्षे नूतनीकरण करता येते. ही योजना बँका, पोस्ट ऑफिसद्वारे राबविली जाते.
भरपाई कशी मिळते?: मृत्य, दोन्ही डोळ्यांची संपूर्ण बरी न होणारी हानी झाल्यास, दोन्ही हात, एक हात, एक पाय निकामी झाल्यास दोन लाख आणि एका डोळ्ळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी झाल्यास एक लाख रुपये भरपाई मिळू शकते.
४३६ रुपयांचा हप्ता :योजनेसाठी वार्षिक ४३६ रुपयांचा हप्ता आहे. खाते असलेल्या बँकेतील खात्यातून ही रक्कम कपात करून घेतली जाते.
कोण पात्र आहे? : १८ वर्षे पूर्ण झालेले आणि ५० वर्षाच्या आतील खातेधारकांना योजनेत सहभागी होता येते. यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑटो डेबिटची सुविधा आहे. योजनेचा कालावधी दि. १ जून ते ३१ मेपर्यंत असा असतो.अनेक खाती असल्यास : एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्त्ती कुठल्याही एकाच बचत खात्यावर हा विमा उतरवून शकते. विमा उतरवणाऱ्या, व्यक्तींचा आधार क्रमांक पायाभूत मानला जातो.