संस्थांच्या निवडणुकांचा पंधरा दिवसच धुरळा | आजपासून प्रक्रिया पुन्हा होणार सुरू

0
1

पावसाळ्यामुळे तीन महिने लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आज, मंगळवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकार विभागाला दिले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता निवडणुकांचा धुरळा पंधरा दिवसच उडणार, हे निश्चित आहे. कोरोनापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक बिघडले आहे. कोरोनानंतर निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली, पण वेगवेगळ्या कारणाने लांबणीवर टाकल्या गेल्या. ऑक्टोबर २०२३ नंतर निवडणूक घेण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले होते. काही संस्थांच्या निवडणुका झाल्या तोपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तब्बल दोन महिने राहिली. तोपर्यंत पावसाळ्याचे कारण पुढे करत ३० सप्टेंबर पर्यंत लांबणीवर टाकल्या होत्या.

२.५ वर्षे मुदतबाह्य संचालक मंडळ
जिल्ह्यातील काही संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने तिथे अडीच-तीन वर्षे मुदत संपलेले संचालक मंडळ कार्यरत आहे.
‘ड’ वर्गातील संस्थांचा कार्यक्रम सुरू राहणार?
सहकारी संस्थाच्या निवडणुकांना सतत स्थगिती दिल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे आल्या आहेत. गेल्या आठवड्यात सहकार विभागाच्या बैठकीत आचार संहिता सुरु झाली, ती कमी सभासद संख्या असलेल्या ‘ड’ वर्गातील संस्थांचा कार्यक्रम सुरू ठेवण्याबाबत गांभीयनि विचार असल्याचे समजते.
मुदत संपलेल्या
संस्था :’ब’ वर्ग : १७३’क’ वर्ग : २,३८२ ‘ड’ वर्ग
(दुग्ध) : २७५ ‘ड’ वर्ग
(इतर) : १,०९५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here