जत :दंवडी म्हटले की प्रत्येक गावागावात कोणातही संदेश पोहचविणारा व्यक्ती समोर उभे राहतो.१५-२० वर्षापुर्वी मोबाईल क्रांती होण़्याअगोदर ग्रामीण भागातील गावागावातील दंवडीला फार महत्व होते.
गावकऱ्यांना कोणातही संदेश पोहचविण्यासाठी गावातील प्रत्येक चौकत एकादा नेमून दिलेला व्यक्ती कसलेतर लक्ष वेधक वाद्य वाजवून संदेश मोठ्या आवाजात म्हणून दाखविणारा व्यक्ती होता.त्या काळात या दंवडी देणाऱ्या व्यक्तीला मोठे महत्व होते.प्रत्येक चौकत दंवडी ऐकली जायाची,ग्रामपंचायत,सण,वार,ऐतिहासिक कार्यक्रम किंवा अन्य महत्वाचे संदेश गावकऱ्यापर्यंत या दंवडीच्या माध्यमातून पोहचविले जायाचे.
नव्वदच्या दशकात मोबाइल क्रांती झाली,तेव्हापासून अनेक गावातील दंवडी प्रकार लुप्त होत गेला.मात्र याला जत तालुका अपवाद असून जत तालुक्यात अनेक गावात मोबाइल क्रांतीच्या युगातही दंवडी व दंवडी देणारा टिकून आहे,हे विशेष..
जत तालुक्यात कन्नड भाषिक गावात दंवडी देणारा व्यक्ती
https://x.com/sansankettimes/status/1841152839869219161?t=NjYKRhulVcR4jJHUEr4zEw&s=19