विटा बसस्थानक पुर्नबांधणी,मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमीपूजन

0
3
सांगली : विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी बापू पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी जि. प. सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर,  आनंदराव पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

सुमारे 13 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये 18 फलाटाची निर्मिती करण्यात येणार असून सर्व बांधकाम हे आरसीसी स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच गेट त्याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

या अद्यावत बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे लोकांना अत्याधुनिक सोयी, सुविधायुक्त बसस्थानक मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, विटा बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक विद्या कदम, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक विजय मोरे, रमेश कांबळे, रोहित गुरव, विनायक माळी, सुशांत पाटील, रमेश पाटील यांच्यासह इतर परिवहन महामंडळाचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here