संख/आवंढी : जत तालुक्यातील सनमडी,कोळीगिरी,गुड्डापूर,वाळेखिंडी,सिंगनहळ्ळी,आंवढी या गावातील महिलांना भगर खाल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले असून शेकडो महिलांना भगर खाल्याने त्रास जाणवू लागल्याने जवळच्या सरकारी,खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यात आले आहेत.आरोग्य यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत आहे.जत शहरातील एका होलसेल व्यापाऱ्याकडून हे भगर पिठ खरेदी केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान संख (ता.जत) येथील परिसरातील नवरात्र उत्सवानिमित्त उपवास केलेल्या महिलांनी शुक्रवारी शिजवलेली भगर व भगरीच्या पिठाचे भाकरी बनवून खाल्याने त्यातील अंदाजे 20 ते 25 नागरिकांना त्रास सुरू झाल्याने संख येथील खासगी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये उपचार करण्यात आले.
अधिक माहिती अशी की,संख,आंसगी (जत ),पाढरेवाडी, कुळावाडी असे या गावातील नागरिकांनी किराणा दुकानातून भगरीच्या पिठ आणून शुक्रवारी शिजवलेली भगर व भगरीच्या पिठाचे भाकरी बनवून खाल्याने विषबाधा झालेचा प्रकार समोर येत आहे.जत तालुक्यातील अन्न भेसळयुक्त पदार्थ पिठामुळे झाल्याचे नागरिकां मध्ये व सोशल मीडिया वर जोरदार चर्चा आहे.भगरीची भाकर खाल्ल्याने ऍडमिट झाले होते व सर्व रुग्ण बरे होऊन घरी घेले आहेत. तसेच याची लक्षणे चक्कर येणे उलटी येणे हा प्रकार चालू आहे,तरी संख मधील सर्व रुग्ण बरे झाले आहेत.
गावातील किराणा दुकानाचे सर्व्हे करून तात्काळ भगरीच्या पिठाचे विक्री करणे थांबवले असून,बाधित रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत.कोणतीही जीवित हानी व कोणताही धोका नाही,नागरिकांनी असे काही खरेदी करताना घ्यावी, अशी माहिती संख येथील आरोग्य विभागचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत बुरुकुले यांनी माहिती दिली आहे.
भगरीच्या पिठामुळे विषबाधा,नागरिकांनी खबरदारी घ्यावी
जत तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना भगरीच्या पिठामुळे विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक महिला,नागरिक उपवास करीत असल्याने हा प्रकार गंभीर आहे.या घटनेची तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.आपल्यापैकी कोणाला अशक्तपणा, चक्कर येणे किंवा इतर कोणतेही त्रास जाणवत असतील तर कृपया तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. आपली प्रकृती सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारी घ्यावी,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले आहे.
विषबाधा उपचार माहितीसाठी हि लिंक बघा
https://www.bajajfinservhealth.in/mr/articles/food-poisoning