राज्यभरात काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहे, असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच महाविकास आघाडीचा उमेदवार जो कोणी असेल त्याला पूर्ण समर्थन देऊन विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला.यावेळी बैठकीत श्रीमती शैलजा ताई पाटील,श्रीमती जयश्री ताई पाटील,पृथ्वीराज बाबा पाटील,जिल्हातील काँग्रेस तालुका अध्यक्ष,सेवादलाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.