मोटारीच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार | जतनजिक रेवनाळ फाट्याजवळ अपघात : चालक ताब्यात

0
379

जत : जत शहरापासून जवळच असलेल्या रेवनाळ फाट्याजवळ कारने मोटार सायकलला जोराची प्रशांत लोखंडे धडक दिली. (मयत) या अपघातात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महीम येथील अजय लिंगाप्पा कारंडे (वय २३) व प्रशांत दत्तात्रय लोखंडे (वय २४) हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक प्रशांत पवार (रा. बारामती) यास ताब्यात घेतले आहे.

मयत अजय कारंडे व प्रशांत लोखंडे हे त्यांच्या कामानिमित्त दुचाकीने (एम.एच. ४५ ए.यु. ३३९३) जत शहरात आले होते. जतहून काम आटोपून ते आपल्या महीम या गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी रेवनाळ फाट्यावरील बसथांब्याजवळ आली असता, समोरुन बारामतीकडून येणाऱ्या कारने (एम.एच. ४२ बी.एन. ९९९३) समोरासमोरच दुचाकीला भीषण धडक दिली. दोन्ही वाहने वेगात असल्याने कारने दुचाकीला धडक देताच दुचाकी तब्बल दीडशे फूट सिमेंट रस्त्यावरुन फरफटत गेली.

यामुळे दुचाकीस्वार कारंडे व लोखंडे यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर इजा झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

एअर बॅग उघडल्याने चौघे बचावले

कारने मोटारसायकलला इतकी जोराची धडक दिली की, या धडकेनंतर मोटारसायकल दीडशे फूट फरफटत गेली. तर कारचे एअर बॅग वेळीच उघडल्याने कारमधील चौघेही सुरक्षित राहिले. कारमधील प्रवासी हे लग्न समारंभानिमित्त कर्नाटककडे निघाले होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here