मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता

0
7

कुटुंबातील तीन सदस्याची हत्या केल्या प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेल्या एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. केवळ संशयाच्या आधारे एखाद्या आरोपीला दोषी ठरवता येत नसल्याचे निरीक्षण सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंदवले.आरोपीच्या शेजाऱ्यांनी नोंदवलेली साक्ष फेटाळून लावत न्या. बी. आर. गवई, न्या. प्रशांत कुमार मिश्रा व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने आरोपीची शिक्षा रद्द केली. दोषी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार वाद होत असल्याचा जबाब आरोपीच्या शेजाऱ्यांनी नोंदवला होता. मात्र, संशय कितीही भक्कम असला तरी तो वाजवी संशयापलीकडे पुराव्याचे स्थान घेवू शकत नाही. त्यामुळे एखाद्या आरोपीला केवळ संशयाच्या आधारे दोषी ठवरले जावू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने स्थानिक न्यायालयाचा व मुंबई उच्च न्यायालयाने आरोपाला ठोठावलेली शिक्षा रद्द केली.घटना घडल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी आरोपींच्या शेजाऱ्यांचे जवाब नोंदवण्यात आले होते. यासोबत हत्येसाठी वारण्यात आलेल्या शस्रांचा व हत्येच्या घटनेचे संदर्भ जुळत नव्हता, हे मुद्दे लक्षात घेत दोषी व्यक्तीनेच कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आहे, याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे नमूद करत खंडपीठाने आरोपीची शिक्षा रद्द केली.

४ ऑक्टोबर २०१२ रोजी विश्वजीत कर्बा याच्या वानवडी येथील चंपारत्न सोसायटीमधील सद‌निकेत दरोडा पडला असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यात त्याची आई शोभा, बायको अर्चना आणि दोन वर्षांची मुलगी किमया मसाळकर यांची हत्या झाली. यात त्यांचे शेजारी मधुसुदन कुलकर्णी हे देखील जखमी झाले. तातडीने नियंत्रण कक्षाकडून वानवडी पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त बाजीराव मोहिते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तक्रारदाराच्या सांगण्यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात केला. गुन्हेगारांनी ८ तोळ्याची सोन्याची चेन, मंगळसुत्र, ३ अंगठ्या, २ बदामाच्या आकाराचे पेंडट असा सुमारे ३ लाख ७ हजाराचा ऐवज चोरी झाल्याचे तक्रारदाराने अर्जात नमूद केले. मात्र घटनास्थळी पंचनामा करताना तत्कालीन तपास अधिकारी मोहिते यांना दरवाजा जबदरस्तीने उघडला असल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत, तसेच जे दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याचे फिर्यादीने सांगितले होते, त्या सर्व वस्तु सदनिकेतच शोध घेतल्यावर सापडल्या. मुख्य दरवाज्यापाशी रक्ताने माखलेली बांगडी आणि ओढणी आढळून आली. तपासादरम्यान फिर्यादीचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. जेव्हा तिला फिर्यादीचे लग्न झाले असल्याचे कळले तेव्हा तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा फिर्यादीने तिच्यासाठी बायको आणि मुलीला सोडून देण्याची तयारी दाखवली.


दरम्यान, घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, फिर्यादी मोटरसायकलवरून बाहेर जाताना आढळला आणि संशयाची सुई फिर्यादीच्या दिशेने वळली. शवविच्छेदना दरम्यान, मुलीचा मृत्यू गुदमरून झाल्याचे तर आई आणि बायकोचा मृत्यू हा डोक्याला गंभीर आघात झाल्याने झाला असल्याचे आढळले. आरोपीने गुन्हा कबूल करताना बायकोचे मंगळसुत्र दुसऱ्या घरी लपवले असल्याचे तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला हातोडा एका निळ्या बॅगमध्ये भरून कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे सांगितले. सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु झाली, त्यात सरकारी वकिलांनी
१६ साक्षीदार तपासले आणि न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. या निकालाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालायात आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी फाशीची शिक्षा रद्द केली आणि आरोपीला निर्दोष सोडण्याचे आदेश दिले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here