यंदा ५६,६५० तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

0
2

विधानसभा निवडणुकीचा बिगुल मंगळवारी वाजला असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी आठ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतदार यादीनुसार जिल्ह्यातील २५ लाख ७२ हजार २६० एवढ्या मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५६ हजार ६५० नवमतदार असून, ते मतदानासाठी खूप उत्साही आहे. या मतदारांच्या बोटावर पहिल्यांदाच शाई लागणार आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये १८-१९ गटांतील तब्बल ५६ हजार ६५० मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

ही आकडेवारी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध यादीनुसार आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. १८ ते १९ वयोगटातील सर्वाधिक मतदार हे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. या ठिकाणी सात हजार ९२९ तर खानापूरला सात हजार ४८६, जत सात हजार ४११ आणि मिरज विधानसभा मतदारसंघात सात हजार ४६० मतदार आहेत. सर्वात कमी नवमतदारांची नोंद इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात झाली असून, ती पाच हजार ८६७ आहे. विधानसभा निवडणुकीच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे नवमतदारांना कधी एकदा मतदानाची तारीख येते आणि मतदान करतो याची उत्सुकता आहे.

नवमतदारांमध्ये यंदा तरुणांची संख्या जास्त 
जिल्ह्यात १८-१९ वयोगटांत भक्कम वाढ झाली. ५६ हजार ६५० नवमतदारांची नोंद दिसून येत आहे. यामध्ये मात्र तरुणांची संख्या जास्त आहे. मतदार यादीनुसार, १८-१९ वयोगटांत नोंद नवमतदारांमध्ये २८ हजार ४५५ तरुण असून, २८ हजार १४२ तरुणी आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here