तासगावात सोमवारी शिवप्रेरणा यात्रा | सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान : ‘सजग रहो’चा नारा दिला जाणार

0
3

बांगलादेश व रोहिंग्यांनी देशभरात अतिक्रमण केले आहे. कट्टरतावाद फोफावला आहे. परकीय शक्तींकडून त्याला खतपाणी घातले जात आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद सुरू आहे. हिंदू संस्कृती धोक्यात आहे. त्यामुळे हिंदूंना जागृत करण्यासाठी सोमवारी तासगाव येथे शिवप्रेरणा यात्रा आयोजित केली आहे. यात्रेनंतर नगरपालिकेच्या नाट्यगृहात सकाळी 10 वाजता प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कर्ते सुरेश चव्हाणके यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी हिंदूंना ‘सजग रहो’चा नारा दिला जाणार आहे. ही माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, देशभरात शिवप्रेरणा यात्रा सुरू आहे. ही यात्रा सोमवारी तासगाव येथे येत आहे. प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कर्ते सुरेश चव्हाणके यांचे यांचे व्याख्यान यानिमित्ताने आयोजित केले आहे. सकल हिंदू समाज, शिवप्रतिष्ठान, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर, शाखा तासगाव, शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, तासगाव आदी संघटनांनी या व्याख्यानासाठी पुढाकार घेतला आहे.

सुरेश चव्हाणके यांचे गोरक्षण, लव्ह जिहाद विरोध, राष्ट्रीयत्व यावर चांगला अभ्यास आहे. त्यांची देशभरात व्याख्याने होत असतात. सध्या त्यांची शिवप्रेरणा यात्रा राज्यभरात सुरू आहे. ‘सजग रहो’ असे त्यांच्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. या व्याख्यानाचा हिंदू बंधू – भगिनींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी गोविंद सूर्यवंशी, सिद्धेश्वर लांब, संदीप सावंत, मयुरेश कुलकर्णी, गजानन खेराडकर उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here