विधानसभा निवडणूक,लक्षवेधी लढती | पंढरपूर-मंगळवेढ्यात उमेदवारीचा पेच

0
24

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व प्रमुख पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.अशातच पक्षातील अंतर्गत नाराजी, गटबाजीचा सामना सर्वच पक्षांना सहन करावा लागत आहे. एकाच जागेवर अनेक इच्छुक उमेदवार असल्याने पेच निर्माण झाला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात याचा प्रत्यय येत आहे.

भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या मतदार संघात पक्षातील छुपा वाद चव्हाट्यावर आला आला असून गटबाजीने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. या उलट महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले नसले तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे. भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी परिचारक उमेदवारीसाठी अडून बसले आहेत. आवताडे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. अशातच गेल्या तीन वर्षांपासून आमदारकी असूनही समाधान आवताडे यांना पंढरपूर शहर व तालुक्यात हवा तसा गट बांधता आला नाही. त्यामुळे आमदारकीसाठी ते प्रशांत परिचारक यांच्यावरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.
तुतारीच्या चिन्हावर कोण लढणार?
या मतदारसंघात सध्यस्थितीला महाविकास आघाडीला मतदारसंघात पोषक वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. तुतारीच्या चिन्हावर लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. पोटनिवडणुकीत तीन हजार मतांनी पराभूत झालेले भगीरथ भालके अनेक दिवसांपासूनन आलिप्त आहेत. त्यांना कितपत संधी मिळते ते पाहावे लागणार आहे. गत निवडणुकीत भाजपला साथ देणारे परिचारकही महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हवर निवडणूक लढवू
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here