सांगोला : गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळता विरोधकांना मदत करणाऱ्या उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर सांगोल्यात शेकाप महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आहे. शेकापला सांगोल्याची जागा मिळाली नाही तर आम्ही अपक्ष लढू, असा इशारा डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या डॉक्टर बंधूंनी दिला आहे. शेकापला कंधार, सांगोला व रायगड जिल्ह्यातील एक अशा तीन जागा मिळाल्या पाहिजेत.
मागील निवडणुकीत आघाडीचा धर्म न पाळल्यामुळे सांगोला मतदारसंघात शेकापचा उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाला, ही बाब निश्चितच शरद पवार विचारात घेतील. स्व. गणपतराव देशमुख आणि त्यांच्यानंतर आता आम्ही महाविकास आघाडीत काम करतोय, असे बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले. देशमुख बंधूंनी आपली भूमीका स्पष्ट केल्याने आता महाविकास आघाडीचे नेते आता सांगोला मतदारसंघाबाबत कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, आता निर्णय पक्ष घेईल. आम्हा भावांमध्ये कोणतेही वाद अथवा गटबाजी नाही. उमेदवारी न दिल्यास कार्यकर्त्यांशी चर्चा करून शेकाप अपक्ष म्हणून लडेल.
– डॉ. अनिकेत देशमुख