आंनदाची बातमी | आचारसंहितेतही १०० रूपयात मिळणार आनंदाचा शिधा ! 

0
7
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानातून विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने १०० रूपयात मिळणारा आंनदाचा शिधा‌ मिळणार की नाही,असा संभ्रम होता.मात्र आंनदाच्या शिधाची पिशवी वगळून शिधामधील साहित्य संपूर्ण रेशन कार्ड धारकांना मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगण्यात आले आहे.त्यामुळे शिधा ‌धारकांची दिवाळी गोड‌ होणार आहे.
पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले की, दोन महिन्यात ५ लाख २७ हजार ३४२ लाभार्थ्यांपैकी ३ लाख १७ हजार ७४३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. तर उवर्रीत २ लाख ९ हजार ५९९ लाभार्थ्यांना किट वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. सणासुदीत रेशनकार्ड धारकांना शासनाकडून केवळ शंभर रूपयांत आनंदाचा शिधा दिला जातो. यामध्ये १ किलो साखर, १ किलो तेल, १ किलो, रवा व १ किलो हरभरा डाळीचा समावेश आहे.
गणेशत्सोव निमित्त शिधा वाटप करण्यात आले आहे.नेमका हा उत्सवाचा शिधा वाटप सुरू असतानाच विधानसभेची आचारसंहीता लागू झाली होती. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पिशवीमध्ये आनंदाचा शिधा वाटप केल्या जातो.
त्यामुळे विधानससभेच्या निवडणुकीची आचारसंहीता सुरू असल्याने हा शिधा वाटप होईल का असा संभ्रम नागरीकांमध्ये निर्माण झाला होता. परंतु यावर पर्याय काढत त्या राजकीय पिशवीविनाच कार्डधारकांना शिधामधील साहीत्य देण्यास काही हरकत नसल्याचे स्पष्टीकरण पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे.राज्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here