जत : जत विधानसभा मतदार संघासाठी कॉग्रेसकडून जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत आज (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.जत शहरातून पदयात्रा काढून तहसील कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.पदयात्रा व सभेच्या माध्यमातून ते मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दरम्यान,जतचे पुन्हा मैदान मारण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत समर्थक पूर्ण ताकतीने मैदानात उतरले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.कर्नाटक महाराष्ट्र सिमेलगत असणाऱ्या जत मतदारसंघातही ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे.हा मतदारसंघात परंपरागत कॉग्रेसचा मतदार संघ आहे,मात्र सुरेश खाडे,प्रकाश शेंडगे यांनी ही परंपरा मोठीत काढून भाजपाचा झेंडा फडकावला होता.त्यानंतर विलासराव जगताप यांनीही येथे भाजपाकडून लढून विजय मिळविला होता.गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत तरूण उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कॉग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवत विजय मिळविला होता.यंदा दुसऱ्यांदा ते नशिब आजमावत आहेत.
दरम्यान,आमदार विक्रमसिंह सावंत यांचे सध्यातरी पारडे जड दिसत असून त्यांच्या विरोधात नेमके कोण आव्हान उभे करणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र विरोधक कोणीही असो…तो छोटा असो की मोठा असो… या निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा विश्वास आमदार विक्रमसिंह सावंत यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.
दरम्यान,आमदार सावंत आज (गुरुवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते जत शहरातील मार्केट यार्डमधून तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत.यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.
2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. युवकांची फळी उभारली आहे.जुन्या जाणत्या लोकांना एकत्रित घेऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले जात आहेत.
आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.भाजपकडून विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर का आणखी कोन विरोधक असतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.सध्या भाजपामध्ये बाहेरील उमेदवार विरूध भूमिपुत्र असा उभा संघर्ष पेटला आहे.दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी मिळणारचं अशा पध्दतीने गावभेटीचे दौरे सुरू केले आहेत.तर भूमिपुत्रालाच उमेदवारी मिळावी म्हणून तम्मणगौडा रवीपाटील, प्रकाश जमदाडे, विलासराव जगताप यांनी पवित्रा घेतला आहे,उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणार असे जाहीर केले आहे. सध्यातरी आमदार गोपीचंद पडळकर हेच आमदार विक्रमसिंह सावंत यांचे प्रमुख विरोधक असतील असे चित्र आहे.बंडखोरी झालीच तर तिंरगी लढत होणार हे निश्चित आहे.जत विधानसभेची यावेळची निवडणूक अतिशय रंगतदार, काट्याची होणार आहे, हे मात्र नक्की.