तम्मनगौडा रविपाटील मैदानात | भूमिपुत्रांना डावलले तर बंडखोरी: रविपाटील यांचा इशारा

0
244

जत: भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी आज २ उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने उमेदवारीत भूमिपुत्रांना डावलले तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचा इशारा रवीपाटील यांनी दिला आहे.
जत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून भूमिपुत्र विरुद्ध उपरा असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपकडून गोपीचंद पडळकर हे उमेदवारीच्या स्पर्धेत उतरल्यामुळे भूमिपुत्रांनी त्यांच्या विरोधात जोरदार उठाव केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज आज दाखल केले. भाजप व अपक्ष म्हणूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जतमधून सक्षम भूमिपुत्राला निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे‌. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच असल्याचे रवीपाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी नगरसेवक टिमूभाई एडके, सरपंच परिषद माजी अध्यक्ष बसवराज पाटील, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, माजी नगरसेवक तम्मा सगरे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रवीपाटील म्हणाले की, आपण भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने जतमध्ये बाहेरचा उमेदवार लादू नये अशी आम्ही मागणी केली आहे. भूमिपुत्रांना संधी दिली पाहिजे. उमेदवारीमध्ये दगाफटका झाल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here