राज्यातील हवामानाची स्थिती कशी असणार?
परतीच्या पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढल्यानंतर आता मात्र पाऊस माघारी फिरला आहे. संपूर्ण राज्यात पुढील काही दिवस कोरडे हवामान पाहायला मिळणार असून काही ठिकाणी गुलाबी थंडीचा अनुभव देखील नागरिकांना व्हायला सुरुवात होईल. पुढील 24 तासांमध्ये राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 35°c तर किमान तापमान 25°c च्या आसपास असेल. तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पालघर आणि ठाणे अशा सर्व जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहणार असून हवामान कोरडे असणार आहे. तर पुणे शहरामध्ये निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 34°c असणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर नाशिकमध्ये कमाल तापमान 33°c किमान तापमान 18°c असणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान हे कोरडे असणार असून किमान तापमानामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्येही हवामान कोरडे राहणार आहे. आकाश निरभ्र असणार आहे. तर संभाजीनगर मधील कमाल तापमान 33°c तर किमान तापमान 18°c इतके असेल. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील वातावरण कोरडे हवामान राहणार असून किमान तापमानात घट होणार आहे.